क्रीडा

आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित, विराट नव्हे 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघात बहुतांश युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. टीम इंडिया आणि आयर्लंडमध्ये पाच दिवसांत तीन टी-20 सामने 18, 20 आणि 23 ऑगस्ट खेळले जाणार आहेत. हे तिन्ही सामने डब्लिनमध्ये होणार आहेत.

या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. संघाचे उपकर्णधारपद मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे असेल. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्या खेळाडूंना सहभागी व्हायचे आहे, त्यांच्याकडे संघात जास्त लक्ष देण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडवर आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाचे कर्णधारपदाची धुरा असण्याची शक्यता आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले असून त्याच्याकडे मालिकेचे कर्धारपद सोपवले आहे. बुमराह पाठीच्या दुखापतीशी झुंज देत होता आणि त्याच्यावर न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. जसप्रीत बुमराहने शेवटचा सामना गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने विश्रांती घेतली होती. बुमराहचे पुनरागमन ही टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. बुमराहशिवाय प्रसिद्ध वेगवान गोलंदाज कृष्णाही दुखापतीनंतर संघात परतला आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ :

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद. रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

वृत्तांनुसार, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांचे सहकारी सपोर्ट स्टाफ विक्रम राठौर (फलंदाजी प्रशिक्षक), पारस म्हांबरे (गोलंदाजी प्रशिक्षक) यांनाही आयर्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे आयर्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?