Team India 
क्रीडा

टीम इंडिया जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर; 'असं' आहे टी-२० मालिकेचं शेड्युल, जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय क्रिकेट संघ्याच्या नवीन शेड्युलची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून चार सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

Published by : Naresh Shende

Team India Tour Of South Africa For Four T20: भारतीय क्रिकेट संघ्याच्या नवीन शेड्युलची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून चार सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसरा सामना १० नोव्हेंबरला गेकेबरहामध्ये रंगणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरियनमध्ये १३ नोव्हेंबरला होणार आहे. तसच मालिकेचा शेवटचा म्हणजेच फायनलचा सामना जोहान्सबर्गमध्ये १५ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भारताच्या दौऱ्याबद्दल माहिती दिलीय.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (४ सामन्यांची टी-२० मालिका)

८ नोव्हेंबर - डरबन - पहिला टी-२० सामना

१० नोव्हेंबर - गेकेबरहा - दुसरा टी-२०

१३ नोव्हेंबर - सेंच्युरियन - तिसरा टी-२०

१५ नोव्हेंबर - जोहान्सबर्ग - चौथा टी-२०

दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२४-२५ हंगामासाठी घरेलू टूर्नामेंटची घोषणा केली आहे. भारत बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडसाठी यजमानपद भूषवणार आहे. हा हंगाम सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. बांगलादेशविरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरला चेन्नईत पहिल्या कसोटी सामन्याचं आयोजन केलं जाणार आहे.

तर २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. यानंतर तीन टी-२० सामने धरमशाला, दिल्ली आणि हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. बांगलादेशचा दौरा संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात जाणार आहे. बंगळुरुत १६ ऑक्टोबरला पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. यानंतर पुण्यात २४ ऑक्टोबरपासून दुसरा कसोटी सामना आणि १ नोव्हेंबरपासून मुंबईत तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर