Team India W vs UAE W Google
क्रीडा

टीम इंडियाचा धमाका! धावांचा डोंगर उभा करून UAE चा केला दारुण पराभव; हरमनप्रीत, रिचा घोषची वादळी खेळी

महिला आशिया चषक २०२४ मध्ये आज भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात पाचवा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घालून अमेरिका विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.

Published by : Naresh Shende

India Womens vs United Arab Emirates Women : महिला आशिया चषक २०२४ चा थरार सुरु असून आज भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात पाचवा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने अनेक विक्रमांना गवसणी घालून अमेरिका विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे. यूएई विरोधात भारताने ७८ धावांनी विजय संपादन करून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. हरमनप्रीत कौर (६४) तर रिचा घोषने (६६) धावांची अर्धशतकी खेळी केली.भारताने यूएईला २०२ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या यूएई संघाला भारतीय गोलंदाजांनी १२३ धावांवर रोखलं.

यूएची कर्णधार एषा रोहित ओजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने पहिल्या विकेटसाठी २३ धावा केल्या. मंधानाला या सामन्यात कमाल करता आली नाही. मंधाना १३ धावा करून तंबुत परतली. त्यानंतर शेफाली वर्माने ३७ धावांची खेळी केली. तर डायलन हेमलता अवघ्या २ धावांवर बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जलाही धावांचा सूर गवसला नाही. तिने फक्त १४ धावा केल्या. अंतिम षटकांमध्ये हरमनप्रीत कौर आणि रिचा घोषने आक्रमक खेळी करून ५ व्या विकेटसाठी ७५ धावा कुटल्या.

टीम इंडियाने पहिल्यांदाच केल्या २०० हून अधिक धावा

कर्णधार हरमनप्रीत कौरने ४७ चेंडूत ६६ धावा केल्या. यामध्ये ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. अंतिम षटकात रिचा घोषने सलग पाच चौकार ठोकून अर्धशतक ठोकलं. रिचाने २९ चेंडूत ६४ धावा केल्या. यामध्ये १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २०० धावांचा टप्पा पार केला. टीम इंडियाने २०२ धावा करून अमेरिकेला सामना जिंकण्यासाठी तगडं आव्हान दिलं होतं. यूएईसाठी कर्णधार ओजाने ३८ तर केविशाने ४० धावा केल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली