IND vs IRE, T20 World Cup 
क्रीडा

T20 World Cup 2024 : आयर्लंड विरोधात रंगणार भारताचा पहिला सामना, कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI? रोहित शर्मा म्हणाला...

टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरोधात रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Published by : Naresh Shende

Rohit Sharma On Indian Playing 11 : टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरोधात रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळणार आहे. कारण ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी अधिक पोषक आहे. अशातच भारताची प्लेईंग ११ काय असणार? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधून खेळपट्टी आणि संघाबाबत माहिती दिलीय. प्लेईंग ११ मध्ये चार फिरकीपटूंचा समावेश करणार असल्याचं रोहित शर्मानं म्हटलं आहे. यावेळी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचंही रोहितने म्हटलं आहे.

कर्णधार रोहित शर्माने म्हटलं, आमच्याकडे दोन फिरकीपटू आणि दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. कुलदीप, युजवेंद्रशिवाय रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलसारखे खेळाडू आहेत. संघात समतोल ठेवायचा असेल तर तुमच्याकडे चांगले अष्टपैलू खेळाडू असणे गरजेचे आहे. यामुळे संघाचा समतोल राखण्यास मदत मिळते. या खेळाडूंचा वापर कसा करायचा आहे, याविषयी आम्ही जास्त विचार केलेला नाही.

या वर्ल्डकपमध्ये या चारही खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची असेल. यात काही शंका नाही. प्लेईंग ११ मध्ये या सर्वांना कसं खेळवायचं याबाबत आम्ही विचार करू. तुमच्याकडे जास्त विकल्प असणे टीमसाठी चांगलं असतं. बांगलादेशविरोधात फिरकीपटूंनी दोन-दोन ओव्हर्स केल्या होत्या. प्लेईंग ११ मध्ये जास्त गोलंदाज असावेत. तसच तगडे फलंदाजही असावेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा