क्रीडा

IND vs NED : सुपर-8पूर्वी टीम इंडियाची ‘अग्निपरीक्षा’; नेदरलँड्सविरुद्ध नवा प्रयोग?

टी-२० विश्वचषक २०२६मध्ये सलग विजयांची हॅट्ट्रिक करत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत मात केल्यानंतर भारतीय संघ आता नेदरलँड्सच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे.

Published by : Varsha Bhasmare

भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६मध्ये सलग विजयांची हॅट्ट्रिक करत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत मात केल्यानंतर भारतीय संघ आता नेदरलँड्सच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाला आहे. सुपर-८ फेरीत प्रवेश आधीच निश्चित असला तरी हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण ‘नॉकआऊट’ टप्प्यापूर्वी संघाची अंतिम रंगीत तालीम याच सामन्यात होणार आहे.

अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा

युवा सलामीवीर Abhishek Sharma याच्यासाठी हा सामना खास ठरणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानविरुद्धही त्याचे खाते उघडले नाही. सुपर-८पूर्वी आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मोठी खेळी करण्याची संधी त्याच्यासमोर आहे. संघ व्यवस्थापनालाही त्याच्याकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा असेल.

इशानचा फॉर्म, पण फिरकीचा पेच

Ishan Kishan जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने संघाच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मात्र, मधल्या फळीत फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष जाणवतो आहे. नेदरलँड्सकडे आर्यन दत्त आणि रोलोफ वॅन डर मर्वे यांसारखे अनुभवी फिरकीपटू आहेत, जे भारतीय फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतात.

गोलंदाजांची धार कायम राहणार?

वेगवान गोलंदाज Jasprit Bumrah आणि अर्शदीप सिंग यांनी आतापर्यंत अचूक माऱ्याने प्रतिस्पर्ध्यांना रोखले आहे. तर फिरकीत Varun Chakravarthy याने प्रभाव टाकला आहे. कर्णधार Suryakumar Yadav गोलंदाजीतील हा ताळमेळ कायम ठेवण्यावर भर देणार आहे.

थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?

हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल, तर डिजिटल स्ट्रीमिंगसाठी जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना रोमांचक ठरणार आहे.

एकूणच, सुपर-८पूर्वी संघरचना, फलंदाजीतील स्थैर्य आणि फिरकीविरुद्धचा दृष्टिकोन यांची खरी कसोटी या सामन्यात लागणार आहे. नेदरलँड्सचा ‘ऑरेंज आर्मी’ अडथळा पार करत टीम इंडिया विजयी लय कायम राखणार का, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

दोन्ही संघांची संभाव्य 'प्लेइंग इलेव्हन'

(Probable XI) भारत: अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

नेदरलँड्स: मायकल लेविट, मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), जॅक लायन-कॅशेट, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रोलोफ वॅन डर मर्वे, काईल क्लेन, पॉल वॅन मीकेरेन.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा