क्रीडा

Team India Rally: टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; बस मात्र गुजरातची

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेर भारतात पोहोचला आहे.

Published by : Dhanshree Shintre

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेर भारतात पोहोचला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विश्वविजेत्या संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती, जेणेकरून रोहित शर्माचे सैन्य आणि प्रसारमाध्यमांनी मायदेशी परतता यावे. एअर इंडियाचे विमान AIC24WC आज सकाळी भारतात पोहोचले.

भारतीय संघाच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळाबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. रोहित शर्माच्या सैन्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले. त्यांची 17 वर्षांची प्रतीक्षा आज संपली. भारताने यापूर्वी 2007 मध्ये तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला होता.

वर्ल्ड कप विजयी संघांचं 4 जुलै रोजी संध्याकाळी मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. टीम इंडियाची विजयी मिरवणूक ही नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान काढण्यात येणार आहे. डबल डेकर ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी खास गुजरातमधून ही बस मागवण्यात आली आहे. या बसवर वर्ल्ड कप विजयी संघांचे स्टीकर लावण्यात आले आहेत.

टीम इंडियाच्या मुंबईतील विजयी मिरवणुकीसाठी गुजराती बस असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत गुजरातच्या बसमधून विजयी मिरवणूक निघणार असल्याची माहिती आहे. विजयी जल्लोषासाठी गुजरातमधून बस आणल्याची माहिती आहे. बेस्टच्या ताफ्यात एवढ्या बस असताना गुजरातमधून बस कशासाठी? मुंबईमध्ये मिरवणूक काढण्यासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे. 2007मध्ये बेस्टच्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती आता मात्र गुजराती बसमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा