क्रीडा

स्टार खेळाडू व्यंकटेशच्या मानेवर लागला बॉल अन् तो मैदानातच कोसळला

व्यंकटेश अय्यरने धमाकेदार शैलीत टीम इंडियात केला होता प्रवेश

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याच्यासोबत मोठा अपघात झाला आहे. एका सामन्यादरम्यान व्यंकटेशच्या मानेला बॉल लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यामुळे तो मैदानातच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याीत आले.

व्यंकटेश अय्यर सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये सेंट्रल झोनकडून खेळता आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने गोलंदाज गजाच्या बॉलवर षटकार ठोकत आपले खाते उघडले. त्याच्या पुढच्या बॉलवर व्यंकटेशने सरळ शॉट खेळला. यावेळी गजाने चेंडू पकडला आणि बॅटिंगच्या बाजूने स्टंपवर वेगाने फेकला. मात्र, हा चेंडू व्यंकटेशच्या मानेवर लागला. आणि तो मैदानातच कोसळला. तो बॉल अय्यरच्या डोके आणि खांद्याच्या मध्यभागी लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे मैदानावरच रुग्णवाहिका बोलावण्यात आली. परंतु, 27 वर्षीय अय्यरने मैदानातून चालत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर, अय्यर पुन्हा फलंदाजीला आला, मात्र, त्याला केवळ 14 धावा करता आल्या. क्षेत्ररक्षणादरम्यान अय्यरच्या जागी अशोक मनेरियाला खेळवण्यात आले आहे.

दरम्यान, व्यंकटेश अय्यरने धमाकेदार शैलीत टीम इंडियात प्रवेश केला होता. आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळताना त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने धमाका केला होता. एकेकाळी त्याला अष्टपैलू हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणूनही मानले जात होते, कारण हार्दिक दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर होता. पण, आता हार्दिकनेही टीम इंडियात दमदार पुनरागमन केले आहे. आता तो टी-२० विश्वचषकही खेळताना दिसणार आहे. तर व्यंकटेशला त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर व्हावे लागले आहे

image

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bandra : कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

Weather Update : 'या' तारखेपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Donald Trump : 'विरोधात बातम्या द्याल तर थेट चॅनेल्सवर बंदी आणेन'; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

Latest Marathi News Update live : मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद