क्रीडा

Pune : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरण

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४: राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खेळाडूंना सन्मान

Published by : Team Lokshahi

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 2022-23 व 2023-24 या वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार, वरिष्ठ अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप गंधे (बॅडमिंटन) व शकुंतला खटावकर (कबड्डी) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यामध्ये शकुंतला खटावकर या जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला प्रशिक्षक ठरल्या. एकूण १५९ पुरस्कार वितरण करण्यात आले, त्यामध्ये जीवनगौरव, दिव्यांग खेळाडू, थेट पुरस्कार, उत्कृष्ट मार्गदर्शक, साहसी क्रीडा पुरस्कार यांचा समावेश होता. राज्यपालांनी लहान वयातच खेळांचे संस्कार देण्याची गरज अधोरेखित केली. तर मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांनी राज्यातील नवोदित खेळाडूंना प्रेरणा व मार्गदर्शन द्यावे, असे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, खेळाडूंसाठी परदेशी प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट व आधुनिक सुविधा देण्याचे काम राज्य शासन करत आहे. तसेच पुरस्कार रकमेतील वाढ, व स्थानिक स्तरावर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे वितरण त्या-त्या वर्षीच होईल, यासाठी निश्चित उपाययोजना केल्या जातील.

खेळाडूंना शासकीय नोकरीत 5% आरक्षण, थेट नियुक्त्या, व योग क्रीडेसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणा यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. हा सोहळा खेळाडू, प्रशिक्षक, पालक यांच्यासाठी सन्मानाचे व अभिमानाचे क्षण ठरले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा