क्रीडा

IND VS AUS World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार फायनलचा थरार; ऑस्ट्रेलियाशी मेगाफायनलचा महामुकाबला!

19 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी ऑस्ट्रेलियाचा महामुकाबला होईल. कोलकात्यामध्ये रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा तीन विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.

Published by : Team Lokshahi

19 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाशी ऑस्ट्रेलियाचा महामुकाबला होईल. कोलकात्यामध्ये रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा तीन विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या माफक आव्हनाचा कांगारुंनी यशस्वी पाठलाग केला. आता रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 1987, 1999, 2003, 2007 and 2015 हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने उंचावले आहेत.1975 आणि 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा चौथ्यांदा पराभव झालाय. आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या माफक आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने वेगाने पाठलाग केला. ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर यांनी आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी 6.1 षटकात 60 धावांचा पाऊस पाडला.

आत्मविश्वास आणि घरच्या प्रेक्षकांचा फायदा हे भारतासाठी विजयाची सर्वात मोठी शक्ती असेल. तर पाचवेळ वर्ल्डक विजेता ऑस्ट्रेलिया त्याच्या आक्रमक आणि दमछाक करणाऱ्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ खूप वरचढ आहे. आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 13 पैकी 8 सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे. 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि 2003 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update live : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी

Kiara Advani & Sidharth Malhotra : गुडन्यूज! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव