Thomas cup Team Lokshahi
क्रीडा

Thomas cup : 73 वर्षांनी भारताने जिंकला थॉमस कप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन

Published by : Team Lokshahi

Thomas cup 2022 final: भारताने बॅडमिंटनच्या थॉमस कप 2022 फायनलमध्ये इतिहास रचला आहे. भारताने सलग तिसऱ्या सामन्यात गतविजेत्या इंडोनेशियाचा पराभव करत थॉमस कपचे विजेतेपद मिळावले आहे. 73 वर्षांनी प्रथमच थॉमस कपमध्ये (Thomas Cup)भारताला विजेतेपद मिळाले. पाच सामन्याच्या या मालिकेत भारताने 2 सिंगल आणि एक डबल्स मॅच जिंकत 3-0 असा विजय मिळला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीय संघाचे (Team India)अभिनंदन केले आहे.

मलेशिया आणि डेन्मार्कसारख्या संघांना पराभूत करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर संघाचा आत्मविश्वास खूप मजबूत होता. आता अंतिम फेरीत 14 वेळा विक्रमी विजेत्या इंडोनेशियाला पराभूत करून विजेतेपद पटकवले.

किदांबीने लावले विजयाचे टिळक

अनुभवी किंदबी श्रीकांतने भारताच्या कपाळावर विजयाचे टिळक लावले. जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकाचा श्रीकांत जेव्हा कोर्टवर आला तेव्हा त्याच्या खांद्यावर दुसरी एकेरी जिंकण्याची जबाबदारी होती. त्यावेळी भारत 2-0 ने आघाडीवर होता. उजव्या हाताच्या शटलरने वरच्या मानांकित जोनाथन क्रिस्टीचा सरळ गेममध्ये पराभव केला. हा सामना 48 मिनिटे चालला.

अंतिम फेरीच्या दुसऱ्या सामन्यात एकेरी जिंकल्यानंतर दुहेरीचा सामना जिंकला. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकीरेड्डी या भारतीय जोडीने पहिला गेम गमावला, त्यानंतर दुसरा आणि तिसरा गेम जिंकून सामना जिंकला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर