क्रीडा

Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

Published by : Team Lokshahi

ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा इतिहास असलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करणं सुरू ठेवलं. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या संघाला ३-१ असे पराभूत केले आणि ऑलिम्पिक स्पर्धेचे सेमीफायनलचे तिकीट मिळवले. आता भारताचा पुढील सामना बेल्जियमशी होणार आहे.

दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग या तिघांनी भारताकडून प्रत्येकी एक-एक गोला केला. सामना सुरू झाला तेव्हापासूनच भारतीय संघाने आक्रमणाला सुरूवात केली. सामन्याचा निकाल काय लागेल याची कल्पना खूपच लवकर चाहत्यांना आली होती. कारण भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पूर्वार्धात २-० ने आघाडी घेतली होती. उत्तरार्धात संघातील काही खेळाडूंच्या चुकांमुळे ग्रेट ब्रिटनला एक गोल करण्याची संधी मिळाली. भारताने पुन्हा गोल करत सामना ३-१ असा जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघाला तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारणं शक्य झालं.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...