क्रीडा

Tokyo Paralympics मध्ये भारताला एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक

Published by : Lokshahi News

भारताची टोकियो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympic 2020) शानदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत आठ पदकं पटकावलेल्या भारतीय खेळाडूंनी आता एकाच खेळात दोन पदकं खिशात घातली आहेत. उंच उडी स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावत भारताने रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. यामध्ये मरियप्पन थंगावेलुने रौप्य (mariyappan thangavelu won silver) तर शरद कुमारने कांस्य (sharad kumar won Bronze) मिळवलं आहे.

यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दोघांनी उंच उडीच्या T63 स्पर्धेत हे य़श मिळवलं आहे. थंगावेलुने रिओ पॅरालिम्पिकनंतर सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलं आहे. तर रिओमध्ये कांस्य जिंकणारा वरुण सिंह भाटी यंदा पदक जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.

भारताच्या खिशात 10 पदकं
भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. आता उंच उडीमध्ये मरियप्पन थंगावेलु आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिल्यामुळे भारताकडे दोन पदकं वाढली आहेत. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 10 पदकं झाली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया