क्रीडा

Tokyo Paralympics | आशियाई विक्रमासहीत प्रवीण कुमारला रौप्यपदक

Published by : Lokshahi News

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारताची दमदार कामगीरी सुरुच आहे. उंच उडी स्पर्धेत प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केलीय. या स्पर्धेमधील भारताचं हे ११ वं पदक ठरलं आहे.

ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात प्रवीणने १.८८ मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १.९३ मीटरची उडी मारली. इथून एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये अटीतटीचा सामना सुरु झाला. तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने १.९७ मीटरची उडी मारली. त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने कडवी झुंज दिली. पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी २.०४ मीटर उडी मारली. त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करत पदकासाठीची चुरस आणखीन वाढवली. पुढील प्रयत्नात प्रवीणने २.०७ मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वत:च्या नावे केला. अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली. मात्र येथे एडवर्ड्सने २.१० मीटर उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

यापूर्वीच भारतीय खेळाडू मरिअप्पन थंगवेलूने उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावले. मंगळवारी अंतिम फेरीत स्थान मिळवणाऱ्या मरिअप्पनने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ प्रकारामध्ये रौप्यपदक जिंकले. याच प्रकारात शरद कुमारने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा : पदकांची दशकपूर्ती!
अवनी लेखारा – सुर्वण पदक – शूटींग
सुमित अंतिल – सुर्वण पदक – एथलेटिक्स
भावीना पटेल – रौप्य पदक – टेबल टेनिस
निशाद कुमार – रौप्य पदक – एथलेटिक्स
योगेश कथूरिया – रौप्य पदक – एथलेटिक्स
देवेंद्र झाझरिया – रौप्य पदक – एथलेटिक्स
मरियप्पन थंगावेलु – रौप्य पदक – एथलेटिक्स
सुंदर सिंह गर्जुर – कांस्य पदक – एथलेटिक्स
सिंघराज अधाना – कांस्य पदक – शूटींग
शरद कुमार – कांस्य पदक – एथलेटिक्स

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा