क्रीडा

Bengaluru Bulls VS U Mumba : यू मुंबाची विजयी सूरूवात;बेंगलुरु बुल्सवर 16 पॉईंट्सनी मात

Published by : Lokshahi News

देशात आजपासून प्रो कबड्डी लीगचा थरार सुरु झाला आहे. यू मुंबा विरूद्ध बेंगलुरु बुल्स अशी लढत झाली. या लढतीत यू मुंबाने बेंगलुरु बुल्सवर 16 पॉईंट्सनी मात केली. अभिषेक सिंग मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला.

मुंबईने या सामन्यात बंगळुरुवर 46-30 अशी मात केली आहे. मुंबईच्या अभिषेक सिंगने या सामन्यात तब्बल 19 पॉईंट्स मिळवत बंगळुरुचं कंबरडं मोडलं. त्याने 15 रेड पॉईंट्स आणि 4 बोनस पॉईंट्स मिळवले. अभिषेकव्यतिरिक्त मुंबईच्या रेडर अजित कुमारने 6 पॉईंट्स मिळवले. तर मुंबईच्या बचाव फळीनेदेखील शानदार कामगिरी केली. हरेंद्र कुमारने 4 टॅकल पॉईंट्स मिळवले, तर आशिष कुमारने 3, रिंकूने 2 टॅकल पॉईंट्स मिळवले. कर्णधार फजल अत्राचली आणि मोहसेनने 1 टॅकल पॉईंट मिळवला.

बंगळुरुकडून रेडर चंद्रन रंजित आणि पवन कुमार सर्वात यशस्वी ठरले. रंजितने 12 पॉईंट्स मिळवले, त्यात 8 रेड आणि 4 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. तर पवन कुमारनेदेखील 12 पॉईंट्स मिळवले. त्यात 7 रेड पॉईंट्स आणि 5 बोनस पॉईंट्सचा समावेश होता. भरतने 2 रेड पॉईंट्स मिळवले. बंगळुरुच्या बचाव फळीने सर्वांची निराशा केली. मयुर कदमने 2 आणि जी. बी. मोरे याने 1 टॅकल पॉईंट मिळवला. या दोघांव्यतिरिक्त बंगळुरुच्या कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा