Vaibhav Suryavanshi Makes History 
क्रीडा

U19 WC: फक्त 2 धावांत आऊट, तरी इतिहास रचला! वैभव सूर्यवंशीने केला असा विक्रम की क्रिकेटविश्व चकित

Vaibhav Suryavanshi: अवघ्या 2 धावांत बाद होऊनही वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला.

Published by : Dhanshree Shintre

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेला १०८ धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अवघ्या २ धावांवर परतावा लागला, तरीही त्याने एका अविस्मरणीय विक्रमाच्या नावावर लिहून ठेवला आहे. जगातील या स्पर्धेत खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीने नाव कोरले आहे.

वैभव सूर्यवंशीने हा सामना खेळताना वय वर्षे १४ आणि २९४ दिवस असताना पदार्पण केले. यामुळे तो अंडर-१९ वर्ल्डकप इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कॅनडाच्या नितीश कुमारच्या नावावर होता, ज्याने २०१० मध्ये १५ वर्षे आणि २४५ दिवसांच्या वयात स्पर्धेत भाग घेतला होता. १६ वर्षांनी हा विक्रम मोडणाऱ्या वैभवने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात पदार्पण करताच इतिहास रचला. या विक्रमामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.

वैभव सूर्यवंशीचा क्रिकेट कारकिर्दीतील हा फक्त एकच विक्रम नाही. स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत तो नेतृत्व करणारा सर्वात कमी वयाचा कर्णधार ठरला होता. वय वर्षे १४ आणि २८२ दिवस असताना त्याने कर्णधारपद भूषवले, ज्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार अहमद शहजादचा (१५ वर्षे १४१ दिवस) विक्रम धुळीला मिळाला. तसेच, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात वैभवने नितीश सुदिनीला बाद करून अंडर-१९ वर्ल्डकप इतिहासात विकेट घेणारा सर्वात तरुण गोलंदाज बनला आहे.

याशिवाय, वैभव सूर्यवंशीने यूथ वनडे सामन्यात शतकी खेळी करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणूनही नाव कमावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने ७४ चेंड्यांत १२७ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. राजस्थानचा हा तरुण खेळाडू आता भारतीय अंडर-१९ संघाचा महत्वाचा भाग बनला असून, त्याच्या भविष्यातील कारकिर्दीवर क्रिकेटविश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

याशिवाय, वैभव सूर्यवंशीने यूथ वनडे सामन्यात शतकी खेळी करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणूनही नाव कमावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने ७४ चेंड्यांत १२७ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. राजस्थानचा हा तरुण खेळाडू आता भारतीय अंडर-१९ संघाचा महत्वाचा भाग बनला असून, त्याच्या भविष्यातील कारकिर्दीवर क्रिकेटविश्लेषकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा