Rohit Sharma Fan Viral Video 
क्रीडा

T20 World Cup : "अबे इतना मत मारो बे..."; रोहित शर्माच्या जबरा फॅनला USA पोलिसांनी मैदानातच कुटला; व्हिडीओ होतोय व्हायरल

टी-२० वर्ल्डकपआधी भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जूनला वॉर्म अप मॅच झाली. या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली.

Published by : Naresh Shende

IND vs BAN, Warm Up Match Viral Video : टी-२० वर्ल्डकपआधी भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जूनला वॉर्म अप मॅच झाली. या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळाली. टीम इंडियाचे खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करत होते. त्यावेळी रोहित शर्माचा जबरा फॅन त्याला भेटण्यासाठी मैदानात आला. त्यानंतर यूएस पोलिसांनी त्याला मैदानातच पकडलं आणि त्याला अटक केलं.

हा व्हिडीओ @Gabbbarsingh नावाच्या सोशल मीडियाच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय की, अमेरिकेचे पोलीस त्याच्या चाहत्याला मारत असल्याचं रोहित शर्माला कळलं असेल, अबे इतना मत मारो बे...पोलीस या चाहत्याची धुलाई करत होते, त्यावेळी रोहित शर्मा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत होते. रोहितने हस्तक्षेप केल्यानंतरही पोलिसांनी चाहत्याला पकडलं आणि जमिनीवर ढकलून त्याला अटक केली.

या सामन्यात भारतीय संघाकडून रिषभ पंतने नाबाद ५३, हार्दिक पंड्याच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारताने ५ विकेट्स गमावून १८२ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने २० षटकात ९ विकेट्स गमावून १२२ धावाच केल्या. त्यामुळे टीम इंडियाने या सामन्यात ६० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : 'या'भारतीय माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी; समितीत निवड

Aditi Sunil Tatkare : हेमंत ढोमेचा 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट लवकरच; आदिती तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडला

Anil Ambani : अनिल अंबानींच्या संबंधित सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

Rohit Pawar : 'मानहानीची एवढी काळजी होती तर...'; मानहानीच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया