suryakumar yadav Team Lokshahi
क्रीडा

Video : असं कोण मारतो भाऊ! सुर्याचा 'हा' शॉट पाहून चाहत्यांनी मारला कपाळाला हात

स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅटींग पाहून सर्वच क्रिकेटप्रेमी खूष झाले आहेत. त्याचा एक शॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : टीम इंडियाने 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत विजय मिळवून केली आहे. यावेळी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅटींग पाहून सर्वच क्रिकेटप्रेमी खूष झाले आहेत. यादवने सामन्यात चौकार षटकारांचा पाऊस पाडला आहे. अनेक फलंदाज स्वप्नातही अशी फलंदाजी करू शकत नाहीत, असे अनेकांनी म्हंटले आहे. यातीलच एक शॉट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यात १३व्या षटकात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मधुशंक बॉलिंग करायला आला. हा बॉल दुरून पाहिल्यावर तो एकदाचा बीमरसारखा वाटला. परंतु, तो ऑफ स्टंपच्या बाहेर एक कोन असलेला फ्लॅट फुल टॉस होता. जेव्हा सूर्यकुमार यादव पुढे सरसावला आणि कीपरच्या डोक्यावर षटकार मारला. तेव्हा अख्खे क्रिकेट जगत अवाक् झाले. शॉट पूर्ण करताना सूर्यकुमार केवळ क्रीजच्या बाहेर गेला नाही तर बाजूच्या खेळपट्टीच्याही बाहेर गेला आणि फिनिशिंग टच दिला.

सूर्यकुमारचा हा षटकार पाहून समालोचक आपल्या जागेवर उभा राहिला. आणि प्रेक्षकांमध्ये जमलेल्या आणि टीव्हीवर पाहणाऱ्या चाहत्यांनी आश्चर्याने कपाळावर हात ठेवला. जगात असा फटका फक्त सूर्यकुमार यादवच खेळू शकतो, असे म्हणता येईल. आणि त्याच्या जागी दुसरा फलंदाज असता तर चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला असता.

सूर्यकुमार यादव सामन्याचा हिरो ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांसह 112 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-२० शतक झळकावले. टीम इंडियाने 10.4 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या.

दरम्यान, राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका २-१ ने जिंकली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा