क्रीडा

BCCI Champions Trophy 2025 : भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर ७५ वर्षीय सुनील गावस्करांचा व्हिडिओ व्हायरल

चॅम्पियन ट्रॉफी 2025: भारताच्या विजयाच्या आनंदात ७५ वर्षीय सुनील गावस्करांचा व्हिडिओ व्हायरल झाला. न्युझीलंडच्या 252 धावांच्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून विजय मिळवला.

Published by : Team Lokshahi

काल दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड हे संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामान्यासाठी आमनेसामने आले होते. न्युझीलंडने भारताला 252 धावाचं आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 6 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 254 धावा केल्या आणि चॅम्पियन ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. 2013 नंतर 2025 मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून नवा इतिहास रचला आहे.

भारत मिनी वर्ल्ड कप चॅम्पियन झाल्याचा आनंद संपुर्ण भारत साजरा करत असताना, दुसरीकडे मैदानावर जल्लोष सुरु होता. सामान्यानंतर स्टार स्पोर्ट्ससाठी सुनील गावस्कर मैदानावर लाईव्ह होते. त्यांनी काहीकाळ ही जबाबदारी सांभाळली. टीम इंडियाच्या चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद सुरु झाला. सुनील गावस्करांनी आनंद व्यक्त करण्यासाठी माईक खाली ठेवून एकटेच लहान मुलांप्रमाणे नाचू लागले. हा सर्व व्हिडिओ सोशल-मीडियावर व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात