तेंडूलकरांचे जिवलग मित्र कांबळी मुंबईतील शिवाजीपार्कमधील दिवंगत गुरु रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमात पाहायला मिळाले. सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना सचिन तेंडूलकरांसोबत साध बोलण आणि उभ राहण देखील अवघड वाटत होतं. एक काळ होता ज्यावेळेस विनोद गणपत कांबळी हे नाव क्रिकेटच्या जगात धुमाकूळ घालत होते.
16 वर्षांच्या विनोद कांबळींनी 349 नाबाद धावा काढल्या होत्या. डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात भारतीय संघाला एक स्टार खेळाडू मिळाला होता. पण वाईट सवयी त्यांना दिवसेंदिवस अधोगतीच्या दिशेने नेत गेल्या. विनोद कांबळी हे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे असहाय व्यक्ती बनले. यामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना देखील करावा लागला आहे. विनोद कांबळी आर्थिक परिस्थितीही खूप खराब आहे.
बीसीसीआय दर महि्न्याला त्यांना 30 हजारांची पेन्शन स्वरुपात मदत करते. मुंबईतील शिवाजीपार्कमधील कार्यक्रमातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. ज्यात विनोद कांबळींची प्रकृती काहीशी चिंताजनक पाहायला मिळाली होती. याचपार्श्वभूमीवर भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळी यांना रिहॅबसाठी जाण्यासाठी ऑफर दिली होती, आणि ती ऑफर आका कांबळींनी स्विकार देखील केली आहे. रिहॅबसाठी जाण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही आहे याआधी ते 14 ते 15 वेळा रिहॅबसाठी गेले आहेत.