Virat Kohli  Twitter
क्रीडा

अलिबागमध्ये कोहलीचा 'विराट' बंगला! किंगने शेअर केला शानदार VIDEO, कोट्यावधींच्या बंगल्याची खासीयत जाणून घ्या

विराट कोहलीने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अलिबागच्या बंगल्याची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओत विराटने बंगल्याबाबत माहिती शेअर केली आहे.

Published by : Naresh Shende

Virat Kohli Shares Glimpse Stunning Luxury Home : भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून इतिहास रचला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कुटुंबीयांसोबत घरी परतले. रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत पिकनिकला गेला आहे. तर विराट कोहली लंडनमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. याचदरम्यान विराट कोहलीने त्याच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर अलिबागच्या बंगल्याची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओत विराटने बंगल्याबाबत माहिती शेअर केली आहे. विराटने बंगल्यातील आतील भाग, तसच बंगल्याजवळ असलेल्या बागेचं सुंदर दृष्य या व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलं आहे.

१३ कोटींचा बंगला

विराट कोहलीने म्हटलं, "एक हॉलीडे होम असं पाहिजे, जिथे तुम्हाला घरपण वाटलं पाहिजे". विराट कोहलीचा सफेद थिमचा बंगला अलिबागच्या अवासीय गावात मांडवा जेट्टीपासून १० मिनिटांच्या अंतरावर आहे. १० हजार स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर बनलेल्या या बंगल्याची किंमत जवळपास १३ कोटी रुपये आहे.

विराट कोहलीने ६२ सेकंदांच्या या व्हिडीओत कॅप्शनमध्ये लिहिलं, अलिबागमध्ये घर बांधण्याचा प्रवास एक सोपा अनुभव राहिला आहे. या प्रवासानंतरचा हा क्षण खूपच समाधान देणारा आहे. तसच विराट कोहलीने बंगला बांधण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व टीमचे आभार मानले आहेत. विराट म्हणाला, आमच्या स्वप्नांच्या घराला सत्यात उतरवल्याबद्दल संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद. मी माझ्या कुटुंबीयांसोबत या ठिकाणी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्यासाठी आतूर झालो आहे.

आता मला थोडीही वाट पाहायची नाहीय. विराट कोहली बंगल्याबाबत बोलताना म्हणाला, मला लिविंग स्पेस खूप आवडतो. लिविंग स्पेसमध्ये सुविधा असल्या पाहिजेत. घराच्या इंटीरियरमध्ये नैसर्गिक प्रकाशही आहे. नैसर्गिक प्रकाशात राहणं मला खूप आवडतं. हा घर खूप आरामदायक असणार आहे आणि या घरात कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा