सध्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याची मुलगी सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. पहिल्यांदाच विराट कोहली आणि अनुष्काची मुलीचे फोटो सोशल मीडियावर दिसून आले. त्यामुळे कोहली कुटुंब चर्चेत आले आहे. मात्र आता आणखी एका कारणामुळे विराट कोहलीचा व्हिडीयो व्हायरल होत आहे. विराट कडून एक चूक झाली हे त्या व्हिडियोतून दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे चाहते भडकले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी वनडे ४ धावांनी गमावली. यामुळे भारतावर मालिका ३-० अशी गमावण्याची वेळ आली. तिसऱ्या लढतीत भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि दीपक चाहर यांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सर्व जण दीपकच्या खेळीचे कौतुक करत आहेत. पण सामन्यात अशी एक घटना झाली ज्यामुळे सर्वजण संतप्त झालेत.
हा व्हिडीयो भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅचच्या आधीचा आहे. ह्या मॅच अनेक गोष्टी माहित असतील. नेहमीप्रमाणे मॅचच्या आधी दोन्ही देशाचे राष्ट्रगीत लावले जाते. राष्ट्रगीत चालू असताना विराट च्यूइंगम चगळत होता. त्याच्याकडून राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. या वागणुकीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर भडकले.
व्हिडीयो समोर आल्यानंतर विराट कोहलीला नेटकऱ्यांनी या वागणुकीमुळे त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे सांगितले. या कारणांमुळे नेटकरी संतापले आहे.