भारतीय ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. एकदिवसीय मालिकेत सुंदरचा समावेश असल्याने आता त्याला या मालिकेत खेळता येणार आहे की नाही हे पाहावे लागेल.
एका रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे तो दक्षिण आफ्रीकेला एकदिवसीय सामन्यांसाठी रवाना होणार नाही. दरम्यान बीसीसीआयने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार सुंदरला कोरोनाची बाधा काही दिवसांपूर्वी झाली असून तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणात होता. पण आता तो बुधवारी संघासोबत आफ्रिकेला रवाना होणार नाही.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सुंदरचा समावेश असून या मालिकेच्या काही दिवस आधीच सुंदरला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो या मालिकेक खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
भारतीय संघ : के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
एकदिवसीय सामने
19 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 – न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन – दुपारी दोन वाजता