इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने भन्नाट ट्वीट करत इंग्लंड क्रिकेट संघाला डिवचत मजेशीर मीमही शेअर केले आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स येथे खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडला विजयासाठी किवी संघाने २७३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ३ गडी गमावून १७० धावा करू शकला. हा कसोटी सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने इंग्लंड क्रिकेट संघाला ट्रोल केले असून एक मजेशीर मीमही शेअर केले आहे.
'क्या गुंडा बनेगा रे तू' हे मीम शेअर करताना जाफर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला, "जर तुम्ही घरच्या मैदानावर प्रत्येक षटकात ३.६च्या सरासरीने लक्ष्याचा पाठलाग देखील करू शकत नाही, ज्यात डब्ल्यूटीसीचा गुण जोडला जात नाही, तर कसे होईल? कसोटी क्रिकेटसाठी ही चांगली जाहिरात नाही." जाफरच्या या ट्वीटवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे.