क्रीडा

आयपीएलचा IPL सामना सुरू असताना अचानक एक चाहता मैदानात घुसला, वाचा पुढे काय झालं ते...

Published by : Saurabh Gondhali

क्रिकेटच्या सामन्यांचे वेळी अतिउत्साही चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी सुरक्षा कवच तोडून मैदानात घुसतात. अशी एक घटना घडली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्स MUMBAI INDIANS विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ROYAL CHALLENGERS BANGALORE या सामन्यांमध्ये एक चाहता रोहित शर्मा ROHIT SHARMA याला भेटण्यासाठी मैदानावर आला. परंतु अद्याप कोविडचे ते पूर्णपणे निराकरण झालेले नसल्यामुळे रोहितने त्याला वर्चुअलरित्या मिठी मारली. या कृतीचे विराट कोहलीने VIRAT KOHLI सुद्धा कौतुक केले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेले १५२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. अनुज रावतने ४७ चेंडूंत ६६ धावांची मॅच विनिंग खेळी केली आणि त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. विराट कोहली ४८ धावांवर दुर्दैवीरित्या बाद झाला.रोहित शर्मा ( २६) व इशान किशन ( २६) यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु पुढील २९ धावांत त्यांच्या ६ विकेट्स पडल्या.

सूर्यकुमार यादवने ७व्या विकेटसाठी जयदेव उनाडकतसह ४१ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ६८ धावा चोपल्या. जयदेव १३ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मुंबईला ६ बाद १५१ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात अनुज रावत ( Anuj Rawat ) आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ८ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. रावत व विराट कोहली यांनी ५२ चेंडूंत ८० धावांची भागीदारी केली. रावतने ४७ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांनी ६६ धावांची खेळी केली. विराटने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा केल्या.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई