Admin
क्रीडा

WPL Auction 2023 : स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार

महिला प्रीमियर लीगची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महिला प्रीमियर लीगची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सीझनसाठी आज (१३ फेब्रुवारी) मुंबईत ऑक्शन पार पडले.स्पर्धेचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. यामध्ये एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत.

प्रथमच महिला खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. पण त्यापैकी केवळ ८७ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात फ्रँचायझींनी २० खेळाडूंवर १ कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांची बोली लावली.

भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीग (WPL) च्या लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली आहे. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ३,४० कोटी रुपयांना आपल्या टीममध्ये घेतले.या लिलावात भारतीय खेळाडूंसोबतच 30 विदेशी खेळाडूंनाही खरेदी करण्यात आले.

पाच संघ

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर, धर गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतामणी कालिका आणि नीलम बिश्त, नताली सिव्हर-ब्रंट (ENG), अमेलिया कार (NZ), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम (AUS), इसी वोंग (ENG), अमनजोत कौर

दिल्ली कॅपिटल्स: जेमिमाह रॉड्रिग्स, तारा नॉरिस (US), लॉरा किमिन्स (AUS), जेसिया अख्तर, मिन्नू मणी, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जॉन्सन (AUS), स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी आणि अपर्णा मंडल.मेग लॅनिंग (AUS), शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिझान कॅप (SA), तीतास साधू, अॅलिस कॅप्सी (ENG)

गुजरात जायंट्स: सुषमा वर्मा, हर्ले गाला, अश्विनी कुमारी, पारुनिका सिसोदिया आणि शबनम शकील, अॅशले गार्डनर (AUS), बेथ मूनी (AUS), सोफिया डंकले (ENG), अॅनाबेल सदरलँड (AUS), हरलीन देओल, डायंड्रा डॉटिन (WES), स्नेह राणा, एस मेघना, जॉर्जिया वेरेहम (AUS), मानसी जोशी , दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर

आरसीबी: स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन (NZ), कनिका आहुजा, आशा शोभना, हीदर नाइट (ENG), डॅन व्हॅन निकेर्क (SA), प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांज, मेगन शुट (AUS) आणि सहाना पवार, एलिस पेरी (AUS), रेणुका ठाकूर, रिचा घोष, एरिन बर्न्स (AUS), दिशा कसाट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील

यूपी वॉरियर्स: राजेश्वरी गायकवाड, पार्श्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, जी किरण नवगरे, जी. हॅरिस (AUS), देविका वैद्य, लॉरेन बेल (ENG), लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख. सोफी एक्लेस्टन (ENG), दीप्ती शर्मा, तालिया मॅकग्रा (AUS), शबनीम इस्माईल (SA), अलिसा हिली (AUS), अंजली सरवानी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा