क्रीडा

World Athletics Championship: नीरज चोप्रानं गाठली एकाच थ्रोने अंतिम फेरी

Published by : Siddhi Naringrekar

भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्रा (Neeraj Chopra) जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकाच थ्रोने गाठली अंतिम फेरी (World Athletics Championship) शुक्रवारी भालाफेकच्या (Javelin Throw) अंतिम स्पर्धेत त्याने प्रवेश केला. या जागतिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदकाची सर्वात मोठी आशा नीरजकडे आहे. नीरज चोप्राच्या गटात असलेल्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जाकुब वडलाकेनेही स्वत:च्या फेकने अंतिम फेरी गाठली. भारताची 19 वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे.

नीरज चोप्राने या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकल्यास, 2008-09 मधील नॉर्वेच्या अँड्रियास थॉर्किलडसननंतर जागतिक विजेतेपदासह ऑलिम्पिक यशानंतर तो पहिला भालाफेकपटू होईल. नीरज चोप्राच्या गटात असलेल्या टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जाकुब वडलाकेनेही स्वत:च्या फेकने अंतिम फेरी गाठली. त्याने 85.23 मीटर अंतर फेकले.

अंतिम फेरीत जाण्यासाठी पात्रता गुण 83.50 मीटर ठेवण्यात आला होता. नीरज गटाचा भाग होता आणि तो फेकण्यात प्रथम आला. पहिल्याच प्रयत्नात त्याने 88.39 मीटरचे अंतर कापले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. हा त्याचा वर्षातील तिसरा सर्वोत्तम थ्रो आहे.

बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...