क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्रानं रचला इतिहास; जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत मिळवलं रौप्यपदक

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा स्वप्न पूर्ण करत रौप्यपदक पटकावलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत (World Athletics Championships 2022) नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा स्वप्न पूर्ण करत रौप्यपदक पटकावलं आहे.

नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील (World Athletics Championships 2022) पदकांचा दुष्काळ संपला आहे. भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नव्हतं. 2003 सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावलं होतं. नीरजनं रौप्यपदक जिंकलं आहे.

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला. तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला. नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला.

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष होतं आणि विश्वास निरजनं जिंकला. काल 88.39 मीटर भाला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र आज त्याची सुरुवात निराशाजनक झाली. फायनलमध्ये नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज