क्रीडा

“तुम्ही रोहितला संघाबाहेर करणार का?”, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना विराटला आवरलं नाही हसू!

Published by : Lokshahi News

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून हार मानावी लागली. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि के.एल राहुल (K L Rahul) फेल ठरल्यामुळे हिटमॅनच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. रोहीतला पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने खातेही खोलू दिले नाही.


या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटला प्रश्न विचारण्यात आला की, इशान किशनचा (Ishan Kishan) फॉर्म पाहता रोहित शर्माऐवजी त्याला संधी मिळायला पाहिजे होती का? असा प्रश्न एका पत्रकाराने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला विचारला. यावर विराट त्या पत्रकाराकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. मला वाटतं की टीम उत्तम खेळली, तुमचं मत काय? तुम्ही रोहितला T20 संघातून बाहेर काढणार? तुम्हाला माहित आहे ना मागच्या सामन्यात त्याने काय केलं? माझा विश्वासच बसत नाही" असं उत्तर देत विराट मान खाली घालून हसायला लागला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : 'या'भारतीय माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी; समितीत निवड

Aditi Sunil Tatkare : हेमंत ढोमेचा 'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट लवकरच; आदिती तटकरे यांच्या हस्ते नारळ फोडला

Anil Ambani : अनिल अंबानींच्या संबंधित सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

Rohit Pawar : 'मानहानीची एवढी काळजी होती तर...'; मानहानीच्या नोटीसीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया