Hulk Hogan  
क्रीडा

Hulk Hogan : हल्क होगन यांचं निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जगप्रसिद्ध रेसलिंग आयकॉन टेरी बोलिया उर्फ ‘हल्क होगन’ यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले.

Published by : Team Lokshahi

(Hulk Hogan) जगप्रसिद्ध रेसलिंग आयकॉन टेरी बोलिया उर्फ ‘हल्क होगन’ यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी सकाळी अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

1990 च्या दशकात हल्क होगन हे केवळ WWE चे सुपरस्टार नव्हते, तर ते पॉप कल्चर आयकॉन मानले जात होते. पिवळा-लाल पोशाख, गॉगल आणि दमदार मिशी यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं उठून दिसायचं. "Say Your Prayers, Eat Your Vitamins" हे त्यांचं घोषवाक्य प्रचंड गाजलं होतं. त्यांनी ‘रेसेलमेनिया 3’ मध्ये आंद्रे द जायंटविरुद्ध ऐतिहासिक सामना खेळला होता, जो 93000 प्रेक्षकांनी थेट पाहिला.

WWE ने शोक व्यक्त करत म्हटलं, “हल्क होगन यांनी WWE ला जागतिक ओळख मिळवून दिली. आम्ही त्यांच्या कुटुंबीय व चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत.” हल्क यांनी केवळ रेसलिंगपुरते आपले योगदान मर्यादित न ठेवता हॉलिवूड चित्रपटांतूनही वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या खास शैलीमुळे ते लहानग्यांचे आदर्श ठरले.

हल्क यांचा दोन वेळा विवाह झाला होता. लिंडा या पहिल्या पत्नीपासून त्यांना ब्रुक आणि निक ही दोन मुलं आहेत. नंतर त्यांनी जेनिफर मॅडॅनियलशी लग्न केलं, जे 2022 मध्ये संपुष्टात आलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India Vs England 4th Test Match : आजचा दिवस ठरणार निर्णायक; सामना जिंकून भारत बरोबरीला येणार की इंग्लंड बाजी मारणार ?

Latest Marathi News Update live : पुणे शहरात कचरा संकलन अधिक कार्यक्षम करण्यासाठी 'इंदूर पॅटर्न' राबविणार

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; पुणे, सातारा, कोकणात ऑरेंज, तर मुंबईला यल्लो अलर्ट जारी

Shravan 2025 : श्रावणात भाविकांसाठी एसटीची विशेष सुविधा; भीमाशंकरसाठी सोडणार 80 बसेस