क्रीडा

WTC Final Day 6 Live | साऊदम्पटनमधून मोठी बातमी; संपूर्ण ओव्हर्सचा खेळवल्या जाण्याची दाट शक्यता

Published by : Lokshahi News

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून आज सहावा दिवसाचा खेळ होणार आहे. आजच्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सामना कोण जिंकतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात कधी पाऊस कधी खराब प्रकाशमान या सर्व व्यत्ययांमुळे ५ दिवसांत सामना पूर्ण होऊ शकला नसल्याने आजचा सहावा राखीव दिवस ही वापरण्यात येणार आहे. मात्र आजच्या वातावरणावर आजच्या दिवशी खेळ होणार का? आणि होणार तर किती ओव्हर्सचा याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान याबाबतच साऊदम्पटनमधून मोठी माहिती समोर आली आहे.

साऊदम्पटनमधून आज समोर आलेल्या माहितीनुसार आज दिवसभर आकाश साफ राहणार आहे. त्यामुळे पाऊस किंवा खराब प्रकाशमानाचा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे इतर दिवशीच्या तुलनेत आज चांगला आणि संपूर्ण ओव्हर्सचा खेळ खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. आज संपूर्ण सामना खेळवला गेल्यास विजयी कोण? हा निर्णयही लवकरच समोर येईल.

संक्षिप्त धावफलक

'भारत (पहिला डाव) : २१७

न्यूझीलंड (पहिला डाव) : ९९.२ षटकांत सर्व बाद २३५(डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यम्सन ४९; मोहम्मद शमी ४/७०, इशांत शर्मा ३/४८)

भारत (दुसरा डाव) : ३० षटकांत २ बाद ६४ (रोहित शर्मा ३०; टिम साऊदी २/१७

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Guru Purnima 2025: 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...'; गुरुपौर्णिमा दिनानिमित्त आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Chhatrapati Sambhajinagar : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप; 375 गावांमध्ये 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम राबवला