सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक पाहायला मिळत आहे. खरंतर उन्हाळ्याचे (summer) खरे दोन महिने म्हणजे एप्रिल आणि मे. परंतु मार्चमध्येच March नागरिकांना उन्हाने त्रस्त केले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidarbha) या भागातील जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरी चाळीसच्या पुढेच आहे.
15 दिवसांपूर्वी साधारण साडे आठशे मेगावॅट (MW) वीज लागत होती परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अकराशे मेगावॅट वीज वापरली जात आहे. उन्हाळा असाच राहिला तर हे प्रमाण अधिक वाढत जाण्याचे चिन्ह आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने (temperature) उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी व लहान मुले हि दुपारच्या वेळेला बाहेर पडत नाहीत. त्यामुळे घरातील पंखा, कुलर, एसी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. तसेच दुकानातून नवनवीन इलेक्ट्रिक वस्तूंची (electric goods) खरेदी सुद्धा नागरिक करत आहेत. यामुळे विजेचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो आहे. राज्यासाठी दररोज 28 हजार मेगावॅट वीज लागत असून मागच्या वर्षी 20 हजार 801 मेगावॅट वीज लागत होती. मागील पंधरा दिवसात जवळ जवळ 250 मेगावॅट विजेचा वापर हा वाढला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज जपून वापरावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.