कोरोनाच्या संकटात आता शेअर बाजारात ही सेन्सेक्सची उतरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज सेन्सेक्स 627.43 अंक म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरून 49,509.15 च्या पातळीवर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी निर्देशांक 154.40 अंक म्हणजेच 1.04 टक्क्यांनी खाली येऊन बंद झाला आहे. आजच्या व्यवसायात बँकिंग, फायनान्स आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक दबाव होता. सेन्सेक्सच्या 30 पैकी 11 शेअर्स ग्रीन मार्कमध्ये बंद झाले आहेत. याशिवाय सर्व शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाली आहे.