शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घरासमोर आज अचानकपणे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.आहे. दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेला कडाडून विरोध करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनावर आता वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थी एका ठीकाणी कोरोना तर दुसऱ्या ठिकाणी अभ्यास, अशी दुहेरी लढाई लढत आहेत. विद्यार्थ्यावर तणाव, दडपण आहे याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता याला सातत्याने प्राथमिकता देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. आम्ही ज्यावेळेस परीक्षेचा निर्णय घेतला, त्यावेळेस आम्ही अनेक तज्ज्ञांची बातचीत केली. सातत्याने आम्ही परीस्थीतीवर लक्ष ठेवून होतो.
पुढे वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सर्वेातपरी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आंदोलक विद्यार्थ्यांच्या संघटनांशी चर्चा करू. उद्या विद्यार्थी व संघटनांशी चर्चा करणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.