Mumbai

सुप्रिया सुळेंचा ‘तो’ फोटो व्हायरल; खाली बसून वडिलांना घातले बूट

Published by : Lokshahi News

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहेत.

लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. अंत्यदर्शनावेळचा त्यांचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण बाप आणि लेकीच्या नात्याचं कौतुक केलं जात आहे.

अंत्यदर्शनाच्या वेळी शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले. हा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."