suresh padvi enters bjp 
Vidhansabha Election

बविआला धक्का! उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपात प्रवेश

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने तावडेंवर हा गंभीर आरोप केला आहे. मात्र, दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये हायव्हॉल्टाज ड्रामा पाहायला मिळाला. संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे वेधले आहे. कारण भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने तावडेंवर हा गंभीर आरोप केला आहे. मात्र, दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशीच बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

थोडक्यात

  • बविआचे उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर

  • बविआचा विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (२० नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. थेट बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी असं या उमेदवाराचं नाव आहे. त्यामुळं हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच डहाणू विधानसभेत भाजपची ताकद वाढली आहे. सुरेश पाडवी यांनी भाजपच्या उमेदावारा आपला पाठिंबा देखील जाहीर केला आहे.

सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : "बोलताना भान ठेऊन बोला" मुख्यमंत्र्यांनी टोचलं पडळकरांचे कान

Kanpur Crime : 'आय लव्ह मोहम्मद' घोषणेवरून वाद; कानपूरमध्ये FIR, बरेलीत फतवा

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती निश्चित, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची 'दशावतार' चित्रपटाला प्रशंसा, कोकणाची व्यथा महाराष्ट्राच्या मनात