India

पुण्यात स्विगी आणि झोमॅटो कंपनीच्या डिलवरी बॉयला चोरी करताना अटक

Published by : Lokshahi News

पुणे शहरातील काळेपडळ, चंदननगर परिसरात खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देण्यास गेलेल्या दोन डिलिव्हरी बॉय आणि त्यांच्यासोबत असलेला एक मित्र, अशा तिघांनी मिळून सोनसाखळी चोरी केल्या होत्या . या तिघांना पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. आकाश सिध्दलिंग जाधव आणि समीर पांडुळे, आणि साहिल अनिल गायकवाड वय 22 हे तिघे ही मूळचे सोलापुर येथील आहेत. पुण्यातील हडपसरच्या निर्मल टॉऊनशिपमधील सोसायटीत 16 तारखेला दुपारच्या सुमारास एका महीलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्राची झटापट करत एका तरुणांनी चोरी केली होती. या जबरी चोरीचा तपास पोलिस करत पोलिसांनी शहरातील 500 पेक्षा अधिक सिसिटीव्ही तपासत चोरांचा शोध घेत होते. तपास पथकातील पोलिस शिपाई प्रशांत दुधाळ आणि निखील पवार यांना मिळालेल्या माहिती वरुन चंदननगर मधील तिघाना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपीनी चोरीची कबुली दिली असून मंगळसूत्र चोर हे स्विगी आणि झोमॅटोचे डिलवरी बॉय असल्याने शहरात खळबळ उडालीय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या