India

Tata in Defense Sector: टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल

Published by : Lokshahi News

भारताचे उद्योगपती रतन टाटा त्याच्या दानशूरपणामुळे प्रसिध्द आहेत. रतन टाटांनी टाटांचे साम्राज्य अनेक क्षेत्रात वाढवले आहे. आता टाटा संरक्षणक्षेत्रात पदार्पण करत आहेत. संरक्षण मंत्रालयाने 'सी-295' या 56 मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास 22000 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षणावरील कॅबिनेट कमिटीने यासाठी नुकताच हिरवा झेंडा दाखविला होता. ही विमाने भारतात बनविण्यात येणार असून टाटा सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहेत. राफेलनंतर ही दुसरी मोठी डील आहे जी भारतीय कंपनीसोबत मिळून केली जाणार आहे. (Govt seals mega deal with Airbus for purchase of 56 C-295 military transport aircraft. )

या डीलमुळे येत्या काही वर्षांत भारतात 6000 हून अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच देशात हवाई क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान येणार आहे. संरक्षण मंत्रालयानुसार हा एकप्रकारचा पहिलाच असा प्रकल्प आहे ज्यामध्ये खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनविणार आहे. आतापर्यंत हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडे ही जबाबदारी होती. आता पहिल्यांदा खासगी कंपनी लष्करासाठी लष्करी विमाने बनविणार आहे.

या डीलनुसार 16 विमाने एअरबस डिफेन्स स्पेनवरून आयात केले जाणार आहेत. अन्य विमाने टाटाच्या प्रकल्पात पुढील १० वर्षांत बनविण्यात येणार आहेत. यासाठी हैदराबाद आणि बंगळूरूच्या आसपास जागा शोधण्यात येत आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील प्रकल्प उभा करता येऊ शकतो. देशात 2012 पासून C295MW ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टच्या दिशेने काम सुरु आहे. यंदा त्याचा प्रस्ताव सीसीएसकडे पाठविण्यात आला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश