तंत्रज्ञान

एलॉन मस्कची मोठी घोषणा, लवकरच ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार

एलॉन मस्कबद्दल एक नवीन बातमी आली आहे जी ट्विटर वापरकर्त्यांना जास्त आश्चर्यचकित करणार नाही.

Published by : Siddhi Naringrekar

एलॉन मस्कबद्दल एक नवीन बातमी आली आहे जी ट्विटर वापरकर्त्यांना जास्त आश्चर्यचकित करणार नाही. ट्विटरचे नवे सीईओ लवकरच त्यांची सोशल मीडिया कंपनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. आज एका ट्विटद्वारे त्यांनी याची घोषणा केली असून लोकांच्या मताचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.

एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी ताबडतोब राजीनामा देईन जो हे पद घेण्यास पात्र असेल. त्यानंतर तो फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमवर लक्ष ठेवेल.

मिळालेल्या माहितीनुसार एलॉन मस्क ट्विटरच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या शोधात आहेत. खरं तर, एलॉन मस्क यांनी अलीकडेच एक ट्विटर पोल घेतला होता. ज्यामध्ये त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यायचा का असे विचारले होते. या मतदानाला प्रतिसाद म्हणून एकूण 57.5 टक्के वापरकर्त्यांनी एलॉन मस्क यांच्या हकालपट्टीच्या बाजूने मतदान केले आणि त्यांनी राजीनामा द्यावा असे सांगितले. या पोलचा निकाल एलॉन मस्कसाठी देखील निराशाजनक असावा कारण त्यांना ट्विटरची जबाबदारी स्वीकारून फक्त 2 महिने झाले आहेत. या रविवारी मस्क यांनी सांगितले होते की ते त्यांच्या पोलच्या निकालांचे अनुसरण करतील आणि जर वापरकर्त्यांना हवे असेल तर ते ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा