तंत्रज्ञान

Chandrayaan-3 | भारत घडवणार इतिहास! चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर

भारताचं मून मिशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे.

Published by : shweta walge


भारताचं मून मिशन यशस्वी होण्याची शक्यता आहे. भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने आपल्या ऐतिहासिक मिशन चांद्रयान-3 बद्दल नवीन अद्यतने शेअर केली आहे.

भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. लँडिंग साईटवर सूर्योदयाची वाट पाहावी लागणार आहे. सर्व काही सुरळीत राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरेल. तसे झाल्यास भारत जगात इतिहास निर्माण करेल.

भारताचं मून मिशन चांद्रयान-3 आतापर्यंतच्या प्लानिंग नुसार सुरू आहे. जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर 5 वाजून 47 मिनिटांनी लँड करेल. रशिया, अमेरिका आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश बनेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा