तंत्रज्ञान

एलॉन मस्कने लोकांना विचारले की मी राजीनामा द्यावा? जाणून घ्या उत्तर काय मिळाले?

आठ महिन्यांपूर्वी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून एलॉन मस्क प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

आठ महिन्यांपूर्वी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून एलॉन मस्क प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. एलॉन मस्क आपल्या ट्विटद्वारे लोकांना आश्चर्यचकित करत आहे. आता त्यांनी असेच काहीसे ट्विट केले आहे. मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी ट्विटर वापरकर्त्यांना सोशल मीडिया साइटच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हावे का, असे विचारले.

सुमारे अर्ध्या तासात 6,192,394 मते पडली. 57.6 टक्क्यांहून अधिक वापरकर्त्यांनी 'होय' असे उत्तर दिले आणि 42.4 टक्के लोकांनी 'नाही' वर क्लिक केले.

मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ताब्यात घेतल्यापासून, अर्ध्याहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणे आणि पूर्वी प्रतिबंधित वापरकर्त्यांना परत परवानगी देणे यासह अनेक बदल झाले आहेत. यासोबतच एलॉन मस्कने ब्लू ट्रिक्स जारी करण्याचे नियमही बदलले आहेत. गेल्या आठवड्यात, ट्विटरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू देखील निलंबित केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा