Flipkart
Flipkart Team Lokshahi
तंत्रज्ञान

Delhi Acid Attack प्रकरणात फ्लिपकार्टचं कनेक्शन! महिला आयोगाने फ्लिपकार्टला पाठवली नोटीस

Published by : shweta walge

दिल्लीच्या द्वारका भागात भरदिवसा एका 17 वर्षीय मुलीवर अ‍ॅसिड अटॅक करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड खरेदी केले होते.

दिल्लीच्या द्वारका येथील १७ वर्षीय विद्यार्थीनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. या घटनेतील मुख्य आरोपींसह ३ जणांनी पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेत मुख्य आरोपी सचिन आरोरा असून, त्याच्यासोबत हर्षित अग्रवाल आणि वीरेंद्र सिंह हे दोघे देखील होते. आरोपींनी ऑनलाइन अ‍ॅसिड मागवले होते. या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्य आरोपीची चौकशी केली असता मिळालाल्या माहितीनुसार, सचिनने पीडितेशी सप्टेंबर महिन्यात मैत्री केली होती. तसेच, या आरोपींनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्टला नोटीस बजावली आहे. तसचे, दिल्ली महिला आयोगाने देखील बेकायदेशीररित्या अ‍ॅसिड विक्री केल्याने फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला नोटीस बजावली आहे.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान