तंत्रज्ञान

Whatsapp Fraud : सावधान ! WhatsApp वर 'प्रोफाईल फोटो स्कॅम' ची धोकादायक वाढ

याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नव्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार रचत आहेत.

Published by : Shamal Sawant

आजच्या डिजिटल युगात WhatsApp हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. जवळपास प्रत्येकजण हे अ‍ॅप वापरत असून मेसेज, कॉल आणि व्हिडीओ कॉलसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, याचाच गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार नव्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार रचत आहेत.

सध्या WhatsApp वर ‘प्रोफाईल फोटो स्कॅम’ नावाचा एक फसवणूक प्रकार समोर येत आहे. या प्रकारात हॅकर्स किंवा फसवणूक करणारे लोक तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा फोटो लावून तुमच्याशी संपर्क साधतात. ते तुम्हाला मेसेज करतात आणि असा आभास निर्माण करतात की ते तुमचे मित्र किंवा नातेवाईक आहेत.

ते व्यक्ती अपघात झाल्याचं किंवा काही अडचणीत असल्याचं कारण सांगून तुमच्याकडून पैसे मागतात. प्रोफाईल फोटो आणि आवाज परिचित असल्यामुळे अनेकजण सहज विश्वास ठेवून पैसे पाठवतात. नंतर लक्षात येतं की आपण फसवले गेलो आहोत. सायबर सुरक्षेच्या तज्ज्ञांनुसार, हे स्कॅमर्स केवळ फोटोच नाही तर आवाजाची नक्कल करून ऑडिओ मेसेज देखील पाठवतात. त्यामुळे फसवणूक ओळखणं कठीण होतं. या सर्वाचा उद्देश एकच – तुमचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक करणं.

जर कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करत असेल, आणि प्रोफाईल फोटो तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसारखा असेल, तर लगेच विश्वास ठेवू नका. थेट संबंधित व्यक्तीशी फोनवर संपर्क साधा आणि सत्य जाणून घ्या. कोणालाही पैसे पाठवण्याआधी खात्री करा की मागणी करणारी व्यक्ती खरी आहे. थोडीशी सावधगिरी आणि सतर्कता ठेवली तर अशा फसवणुकीपासून सहज बचाव होऊ शकतो. WhatsApp वापरताना खबरदारी घ्या आणि सायबर सुरक्षिततेचे नियम पाळा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी