तंत्रज्ञान

‘या’ स्मार्टफोनमध्ये G-Mail, YouTube सह Google अकाऊंट सपोर्ट करणार नाही

Published by : Lokshahi News

गुगलने बाजारामध्ये अपडेट आणले आहे. या अपडेटमध्ये अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी गुगल आता सपोर्ट करणं बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. गुगल हे सपोर्ट बंद करण्याची प्रक्रिया 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू करणार आहे. त्यानंतर युजर्सना त्यांच्या फोनमध्ये Google ड्राइव्ह, Google अकाऊंट, Gmail आणि YouTube एक्सेस करता येणार नाही.

त्यामुळे युजर्सच्या फोनमध्ये आता अँड्रॉइडची किमान 3.0 Honeycomb हे व्हर्जन असणं आवश्यक आहे. असे असले तरी गूगलने युजर्सना दिलासा दिला असून असे सांगितले की, जुने व्हर्जन असलेले युजर्स ब्राउझरद्वारे त्यांचे जीमेल अकाऊंट एक्सेस करू शकणार आहे.


यासंदर्भात 9to5Google ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. जो Google ने आपल्या युजर्सला पाठवलेल्या ई-मेलचा आहे. अँड्रॉइड व्हर्जन 2.3.7 आणि त्यापेक्षा कमी असलेल्या युजर्सना Gmail मध्ये लॉगिन करताना username किंवा password error चा मॅसेज मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या मेलमध्ये, युजर्सनना इशारा देखील देण्यात आला आहे आणि त्यांना त्यांचे फोन अपग्रेड करण्यास सांगितले आहे. 27 सप्टेंबर नंतर, अँड्रॉइडचे असे व्हर्जन असलेल्या सर्व युजर्सना जीमेल, यूट्यूब, गुगल मॅप, यूट्यूब या अॅप्लिकेशनमध्ये एरर येत असल्याचे दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा