तंत्रज्ञान

Gemma 3n : Google चं नवीन AI मॉडेल ग्रामीण भागात ChatGPT ला टक्कर देणार!

Google चं 'Gemma 3n' मॉडेल इंटरनेटशिवाय कार्यरत, ग्रामीण भागात AI क्रांतीची सुरुवात

Published by : Team Lokshahi

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत आता Google ने मोठं पाऊल टाकत ChatGPT ला थेट टक्कर देण्याची तयारी केली आहे. Google ने नुकताच एक असा नवीन AI मॉडेल सादर केला आहे जो इंटरनेटशिवायही काम करू शकतो, हीच या मॉडेलची सर्वात मोठी खासियत आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे AI च्या जगात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘Gemma 3n’ म्हणजे काय?

Google चं हे नवीन ओपन सोर्स AI मॉडेल ‘Gemma 3n’ नावाने ओळखलं जातं. हे एक मल्टीमोडल मॉडेल आहे, म्हणजेच ते केवळ मजकूरच नव्हे तर ऑडिओ, इमेज आणि व्हिडीओ इनपुट देखील ओळखू शकतं. सध्या मात्र हे मॉडेल फक्त टेक्स्ट फॉर्मेटमध्येच उत्तर देऊ शकतं. या मॉडेलच्या आणखी एका विशेष गोष्टीकडे लक्ष वेधले जात आहे – हे AI मॉडेल फक्त 2GB RAM असलेल्या सामान्य स्मार्टफोनवरही सहज चालू शकते. म्हणजेच अत्यंत कमी साधनसंपत्ती असलेल्या भागातसुद्धा हे AI वापरणं शक्य होईल.

ChatGPT ला कशी मिळणार टक्कर?

सध्या ChatGPT वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट बंद झाल्यास ChatGPT देखील कार्यरत राहत नाही. मात्र Google चं Gemma 3n हे मॉडेल इंटरनेटशिवायही काम करू शकतं, यामुळेच त्याला ग्रामीण किंवा इंटरनेट-अभावी क्षेत्रांमध्येही वापरणं शक्य होईल. याशिवाय, Gemma 3n तब्बल 140 हून अधिक भाषा ओळखू शकतो, त्यामुळे हे मॉडेल अधिक व्यापक प्रमाणावर उपयोगी ठरू शकतं. Google ने याआधीही Gemma 3, SignGemma, आणि Gemmaverse हे AI मॉडेल्स सादर केले होते. त्यात आता Gemma 3n हे एक गेमचेंजर मॉडेल म्हणून उभं राहत आहे.

काय बदल घडणार?

जगभरातील अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेटची सुविधा स्थिर नाही. अशा परिस्थितीत Google चं हे नवीन मॉडेल डिजिटल डिव्हाईड कमी करण्यात मदत करणार आहे. शिक्षण, आरोग्य, सरकारी सेवा यांसारख्या क्षेत्रात देखील हे AI तंत्रज्ञान मोठं योगदान देऊ शकतं. यामुळेच, AI च्या या नव्या पर्वात Google चं Gemma 3n मॉडेल ChatGPT ला सळो की पळो करून सोडेल, असं बोललं जातंय. आता यापुढे इंटरनेटशिवायही स्मार्टफोनवर AI तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल