तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84 किंवा +62 नंबरवरून कॉल येत असल्यास त्वरित करा 'हे' काम; अन्यथा...

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांदा परदेशी क्रमांकावरून कॉल येत असतात. परंतु, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिल्यास मोठी बाब घडू शकते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

WhatsApp Unknown Number Calls: व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांदा परदेशी क्रमांकावरून कॉल येत असतात. परंतु, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. काही काळापूर्वी लोकांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार केली होती की त्यांना परदेशी नंबरवरून कॉल येत आहेत. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने एक निवेदन जारी करून युजर्सना अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. तुम्हालाही अनोळखी नंबरवरून मेसेज किंवा कॉल येत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपियासारख्या देशांमधून कॉल येत आहेत. जर तुम्ही नवीन सिम घेतले असेल तर हे कॉल्स आणखी येतात. या कॉल्सचा उद्देश काय आहे हे सध्या तरी कळलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅपने लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना परदेशी नंबरवरून कॉल आले तर त्यांनी ताबडतोब ब्लॉक करून कळवावे. जेणेकरून कंपनी असे नंबर प्लॅटफॉर्मवरून काढून टाकू शकेल.

यासोबतच कंपनीने सांगितले की, ते एआयच्या माध्यमातून असे नंबर ओळखण्यावर काम करत आहेत. जेणेकरून ते ब्लॉक केले जाऊ शकतील. त्यांनी मे महिन्यात प्लॅटफॉर्मवरून 65 लाखांहून अधिक नंबर काढून टाकली आहेत.

असे करा परदेशी क्रमांक त्वरित ब्लॉक

तुम्हाला कधीही परदेशी नंबरवरून संदेश किंवा कॉल आल्यास, त्यास त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा. ब्लॉक करण्यासाठी त्या नंबरच्या चॅट विभागात जा आणि वर दर्शविलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करून ब्लॉक पर्याय निवडा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सेटिंगमध्ये जाऊनही हे काम करू शकता. याशिवाय तुम्ही अ‍ॅपमध्ये अनोळखी नंबरसाठी दुसरी सेटिंग ऑन करू शकता. तुम्ही हे सेटिंग चालू करताच, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप सायलेंट होतील आणि तुम्हाला अनावश्यक कॉल्स अटेंड करावे लागणार नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime : प्रॉपर्टीसाठी भावाने नात्याची गरिमा ओलांडली! बहिणीला दिलं वेड्याचं इंजेक्शन आणि...

Manikrao Kokate Rummy Video : रोहित पवारांच्या ट्वीटमुळे खळबळ '...कामकाज नसल्याने कोकाटेंवर रमी खेळण्याची वेळ'

Uddhav Thackeray On PM Modi : पंतप्रधानांच्या निवृत्तीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले "मोदींच्या निवृत्तीचा विचार सुरू?"

Chinchpokli Chintamani Patpujan : मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा