तंत्रज्ञान

Google Pay New Rule: 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या गुगलचे नवे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Published by : Lokshahi News

गुगलकडून आरबीआयच्या गाईडलाइन्सच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. त्याचा थेट परिणाम ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांवर होणार आहे. हा नियम गूगलच्या सर्व सेवांसह अन्य पेमेंट सेवावांवर लागू होणार आहे. गुगल सेवा युजर्सला या नव्या नियमांबद्दल अधिक येथे जाणून घेता येईल.

1 जानेवारी 2022 पासून गुगल ग्राहकांचे कार्ड डिटेल्स जसे कार्ड क्रमांक आणि एक्सपायरी डेट सेव्ह केली जाणार नाही.याआधी गुगल तुमच्या सर्व कार्ड डिटेल्स सेव्ह करुन ठेवत होता. अशातच आता ग्राहकाला पेमेंट करायचे असल्यास त्याला फक्त आपला सीवीवी क्रमांक द्यावा लागत होता.दरम्यान, 1 जानेवारी नंचक ग्राहकांना मॅन्युअल ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कार्ड क्रमांकासह एक्सपायरी तारीख सुद्धा लक्षात ठेवावी लागणार आहे. खरंतर आरबीआयकडून संवेदनशील माहितींची सुरक्षितता तयार करण्याच्या उद्देषाने कार्ड डिटेल्स सेव्ह न करण्याचे निर्देशन दिले आहेत.

जर तुम्ही VISA किंवा MasterCard चा वापर करत असल्यास नव्या फॉर्मेटमध्ये कार्ड डिटेल्स सेव्ह करण्यासाठी अथॉराइज करावे लागणार आहे.तुम्हाला सध्या कार्ड तपशीलांसह मॅन्युअल पेमेंट करावे लागणार आहे. त्यानंतर कार्डची माहिती पुन्हा देण्यापासून दूर राहण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण पेमेंट करावे लागणार आहे.तसेच RuPay, American Express, Discover किंवा Diners Card चा वापर करत असाल तर गुगलकडून तुमच्या कार्डचे डिटेल्स 31 डिसेंबरनंतर सेव्ह केले जाणार नाहीत.हे कार्ड नवे फॉर्मेट स्विकार करत नाही. अशातच 1 जानेवारी 2022 पासून तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंट करताना कार्ड डिटेल्स द्यावे लागणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा