तंत्रज्ञान

Mobile ads After Phone Call : फोनवरील संभाषणानंतर मोबाईलवर जाहिराती कशा दिसतात?

तुमच्या बोलण्यावर आधारित जाहिरातींचे रहस्य उलगडा: मोबाईल सेटिंग्ज आणि मायक्रोफोनचा वापर

Published by : Team Lokshahi

आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी फोनवर एखाद्या विषयाबाबत चर्चा करून झाल्यावर थोड्यावेळाने नेमके आपण चर्चा केलेल्या विषयाशी संबंधित जाहिराती आपल्या मोबाईलवर कश्या झळकतात ? ज्या विषयावर भाष्य केले गेले आहे नेमक्या त्याच आशयाच्या जाहिराती कश्या आपल्या मोबाईलमध्ये दिसतात ? हा केवळ योगायोग नसून यामागे काही ठराविक करणे आणि तुमच्या मोबाईल मधल्या सेटिंग आहेत. ज्याद्वारे तुम्ही फोनवर जे बोलता त्याच आशयाच्या जाहिराती थोड्या वेळानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतात.

आजच्या डिजिटल युगात अन्न,वस्त्र , निवारा याबरोबरच मोबाईल हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आज आपल्याला प्रत्येक गोष्टींसाठी मोबाईलची आवश्यकता असते.आपण जेव्हा आपल्या प्रियजनांशी किंवा कोणाशीही संवाद साधत असताना एखाद्या विषयावर आपले बोलणे झाल्यानंतर अचानक थोड्या वेळाने आपल्या मोबाईलवर त्याच आशयाच्या जाहिराती दिसू लागतात. हे आपल्या मोबाईल मधल्या काही सेटिंग मुळे आणि आपल्या मोबाइलला असलेल्या मायक्रोफोन मुळे शक्य होते. आपला मोबाईलमधील संवाद आणि जाहिराती यामध्ये साम्य असण्याची खालील काही करणे आहेत.

- जाहिरात कंपन्या तुमच्या फोनमधील ॲप्स, सर्च हिस्ट्री, लोकेशन डेटा आणि इतर ॲक्टिव्हिटीजचा वापर करून तुमच्या संभाषणाशी साधर्म्य साधणाऱ्या जाहिराती दाखवतात.

- फोनमधील मायक्रोफोनचा वापर करून गुगल मोबाईलवरील संभाषणाच्या आधारे जाहिराती दाखवतात.

- तुमचे संभाषण आणि जाहिराती यात साम्य असण्याचे मुख्य कारण म्हणजे, तुमचा डेटा आणि ॲप वापरण्याच्या सवयींचा वापर करून जाहिरात कंपन्या तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडित जाहिरात दाखवतात.

- काहीवेळा तुमच्या फोनमधील ॲप्स तुमच्या संमतीने किंवा त्याशिवाय तुमच्या बोलण्याचा मागोवा घेण्यासाठी तुमच्या फोनचा मायक्रोफोन वापरू शकतात

- तुमच्या फोनमधील अँप्स तुमच्या फोनच्या मायक्रोफोन, कॅमेरा आणि इतर सेन्सर्सना ॲक्सेस करण्याची परवानगी मागतात याद्वारे तुमचे संभाषण आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारे जाहिराती दाखवल्या जातात.

- तुम्ही कोणत्या वेबसाइट्स पाहता, कोणत्या गोष्टी सर्च करता, कोणत्या पोस्ट लाइक करता, यावरून तुमच्या आवडीनिवडीचा अंदाज घेऊन जाहिराती दाखवल्या जातात.

मात्र असे असले तरी यातून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधील विविध अँप्सना दिलेल्या परवानग्या तपासा आणि अनावश्यक ॲप्सना मायक्रोफोन आणि लोकेशन डेटा वापरण्याची परवानगी काढून टाका. ॲडब्लॉक ॲप किंवा ब्राउझरचा वापर करून त्रासदायक जाहिराती तुम्ही टाळू शकता. आणि तुम्ही कोणाशी फोनवर बोलत असताना इंटरनेट बंद असेल किंवा वायफाय शी जोडला गेला नसेल याची खात्री करा. यामधून तुम्ही अश्या जाहिराती टाळू शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली