तंत्रज्ञान

Instagram Reels : इंस्टाग्रामवरुनच डाउनलोड करु शकता रिल्स; कसे? ते जाणून घ्या

इंस्टाग्रामने प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Instagram Reels : इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय अ‍ॅप बनले आहे. रील्स फिचर सुरु झाल्यानंतर त्याचा वापर आणखी वाढला आहे. अगदी मोकळ्या वेळेतही, आपण रील्स स्क्रोल करून नवीन व्हिडिओ पाहतो. दिवसभर आपल्याला कोणाची तरी रील किंवा इतर आवडते. यामध्ये आपल्याला रील सेव्ह करण्याचा पर्याय मिळत असला तरी अनेक वेळा तो डाउनलोड करावा असे आपल्याला वाटते. परंतु, रिल डाउनलोड करण्यासाठी दुसऱ्या अ‍ॅपचा आधार घ्यावा लागतो. परंतु, तुमची ही समस्या आता लवकरच दूर होईल. कारण इंस्टाग्रामने प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडले आहे.

अशा पध्दतीने करा इंस्टाग्राम रिल्स डाउनलोड

इंस्टाग्रामच्या या फिचरमुळे युजर्सना कोणत्याही तृतीय पक्ष वेबसाइट किंवा अ‍ॅपची आवश्यकता नाही.

हे फीचर वापरण्यासठी यूजर्सला रीलआधी प्ले करावी लागेल.

यानंतर युजर्सला शेअर बटणावर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला खाली अनेक पर्याय मिळतील.

अ‍ॅड टू स्टोअर, शेअर, कॉपी लिंकसोबतच तुम्हाला ते डाउनलोड करण्याचा पर्यायही मिळेल.

या पर्यायावर क्लिक केल्यास युजर्सला रील फोनमध्ये डाउनलोड करता येईल.

अशा प्रकारे तुम्ही कोणतीही रील अगदी सहज डाउनलोड करू शकाल.

कोणत्या वापरकर्त्यांना फीचर मिळेल?

इंस्टाग्रामचे नवीन फिचर हे केवळ सार्वजनिक रीलसाठी उपलब्ध असले. जर, पब्लिशर हवे असल्यास ते बंद केले जाऊ शकते. म्हणजेच, पब्लिशरने ते बंद केल्यानंतर तुम्ही ती रील अधिकृतपणे डाउनलोड करू शकणार नाही.

हे फीचर किती दिवसात येईल?

इंस्टाग्राम कंपनीने सध्या नवीन फीचर यूएस मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलवर या फीचरची माहिती दिली आहे. हे फीचर भारतीय वापरकर्त्यांसाठी किंवा इतर देशात कधी लॉन्च केले जाईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद