तंत्रज्ञान

64MP कॅमेरा आणि 8GB RAM सह ‘हा’ स्मार्टफोन लाँच

Published by : Lokshahi News

Huawei नं आपल्या Nova 8 SE सीरिज अंतर्गत पहिला 4G फोन सादर केला आहे. दोन 5G Phone सादर केल्यानंतर आता कंपनीनं Nova 8 SE 4G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे.


स्पेसिफिकेशन्स :

  • फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ ओलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात ऑक्टा-कोर किरिन 710ए चिपसेटचा वापर केला आहे.
  • सोबत माली-जी51 जीपीयू मिळतो. हा डिवाइस 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे.
  • हुवावे नोवा 8 एसई 4जी फोन HarmonyOS 2.0 वर चालतो. फोटोग्राफीसाठी हुवावे नोवा 8 एसई 4जी मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.
  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हुवावे नोवा 8 एसई 4 जीमध्ये 3,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या या मॉडेलची किंमत 2,099 चायनीज युआन जवळपास 24,600 रुपये ठेवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?