तंत्रज्ञान

IPLआधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले

Published by : Lokshahi News

Disney+ Hotstar ने मंगळवारी आपले नवीन प्लॅन आणि 18 नवीन हॉटस्टार स्पेशल सीरीज आणि डिजनी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सच्या चित्रपटांची घोषणा केली आहे. हे नवीन प्लॅन्स भारतात 1 सप्टेंबरपासून लागू होतील. या ओटीटी प्लॅटफॉर्मने मोबाईल, सुपर आणि प्रीमियम अश्या तीन श्रेणीत नवीन प्लॅन सादर केले आहेत. हे नवीन प्लॅन 499 रुपयांपासून सुरु होतील. हे प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट बघता येईल.

1 सप्टेंबरपासून डिजनी+ हॉटस्टारचे विआयपी आणि प्रीमियम प्लॅन बंद करण्यात येतील. कंपनीच्या नवीन बेस प्लॅनचे नाव 'मोबाईल' असे असेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमचे अकॉउंट फक्त एका मोबाईल डिवाइसवर वापरता येईल आणि फक्त एचडी रिजॉल्यूशनमध्ये कंटेंट स्ट्रीम करता येईल. या प्लॅनची किंमत 499 रुपये असेल आणि हा प्लॅन वर्षभर वैध राहील. यापेक्षा मोठा डिजनी+ हॉटस्टारच्या प्लॅनचे नाव 'सुपर' असे आहे. या प्लॅनची किंमत 899 रुपये आहे आणि या प्लॅनची वैधता एक वर्षाची असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा